BSNL ला पुन्हा चांगले दिवस येणार ! BSNL आणि रतन टाटा यांच्यात 15,000 कोटींचा करार | आता स्वस्तात रिचार्ज व Full Range !

शासनाच्या मालकीची असलेली दूरसंचार ऑपरेटर BSNL, (भारत संचार निगम लिमिटेड) कंपनीने 2024 अखेरपर्यंत 4G नेटवर्कची सुविधा तसेच 2025 मध्ये 5G नेटवर्क सुविधा आणण्याची घोषणा केलेली आहे. यासाठी बीएसएनएल ने जवळ जवळ 12000 4G टॉवर्स तयार केलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर BSNL वर युजर ची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ‘दिल्ली मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई या सर्व चार मेट्रो शहरांमध्ये 4G साईट सुरू आहेत. तसेच अहमदाबाद, हैदराबाद, जयपुर, लखनऊ, रायपुर आणि चंदिगड व बहुतेक राज्यांच्या राजधानीतही साईट सक्रिय आहेत’
BSNL आपल्या बहुतांश बेस ट्रान्सिवर स्टेशन्सला(BTS) 4G साठी अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे. सध्या बीएसएनएलचे ८८.८४ दशलक्ष वापरकर्ते आहेत व हा आकडा आता झपाट्याने वाढतो आहे.

BSNL सुधरण्या मागची कारणे 

  • केंद्र सरकारच्या 2024 च्या आर्थिक बजेट मध्ये वित्त मंत्रालयाकडून दूरसंचार प्रकल्प व दूरसंचार विभागातील सार्वजनिक कंपन्यांना ₹१.२८ लाख कोटी इतका निधी पुरवला जाणार आहे. यातील १ लाख कोटी रुपये बीएसएनएल व एमटीएनएल साठी असून ₹८२,९१६ कोटी रुपये बीएसएनएलच्या तंत्रज्ञान सुधारणा व पुनर्रचनासाठी दिले जाणार आहेत. एकंदरीतच दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलच्या पुनरुज जीवनासाठी सरकार विशेष सहाय्यभूत आहे.
  • भारतातील नामांकित आयटी सेवा कंपनी TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व बीएसएनएल मध्ये ₹15000 कोटींचा करार झालेला आहे. अहवालानुसार TCS आणि सरकारी एजन्सी C-DOT भारतात विकसित 4G नेटवर्क सोल्युशन तैनात करणार आहेत. तसेच नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने 5G लॉन्च करतील. यामुळे BSNLला चांगले दिवस येतील असा विश्वास वर्तवला जात आहे.
  • भारताचा दूरसंचार विभाग ‘स्टारलिंक‘ला सॅटॅलाइट  ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन (GMPCS ) परवाना देण्याच्या मार्गावर आहे. स्टारलिंकच्या सेवा इलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या मालकीच्या आहेत. अहवालानुसार भारतातील  स्टारलिंकचे सॅटॅलाइट इंटरनेट 300 Mpbs पर्यंत इंटरनेट प्रदान करू शकते. जे की मोबाईल साठी लागणाऱ्या 94.62Mpbs डाउनलोड गती व 58.62mbps अपलोड गती पेक्षा खूप जास्त अर्थात यामुळे बीएसएनएल चा स्पीड वाढणार आहे.

BSNL चा इतिहास

एकेकाळी BSNL नेटवर्क क्षेत्रातील एक बहुचर्चित व मार्केट मध्ये वर्चस्व गाजवणारी कंपनी होती. बीएसएनएलचे २००८-०९ मधील उत्पन्न ३५,८११.९२ कोटींचे होते.

2007 मध्ये बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) मध्ये झालेल्या घोटाळ्यात, तत्कालीन केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांचे नाव आले होते. या घोटाळ्यात त्यांनी आपल्या खासगी फायबर ऑप्टिक केबल्सच्या जोडणीसाठी सरकारी बीएसएनएल संसाधनांचा गैरवापर केल्याचा आरोप होता. विशेषतः, चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसाठी बीएसएनएलच्या नेटवर्कचा वापर करून विनामूल्य हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळवल्याचा आरोप होता.या प्रकारामुळे सरकारी संसाधनांचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले होते. या घोटाळ्यात BSNL ला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

2008 मध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) घोटाळा भारतातील एक मोठा दूरसंचार घोटाळा होता. या घोटाळ्यात BSNL च्या उच्चस्तरीय अधिकारी आणि काही खासगी कंपन्या सहभागी होत्या. हा घोटाळा मुख्यत: 2G स्पेक्ट्रमच्या वाटपाशी संबंधित होता.

घोटाळ्याच्या मुख्य मुद्द्यांमध्ये स्पेक्ट्रमच्या वाटपात भ्रष्टाचार, खासगी कंपन्यांना कमी किमतीत स्पेक्ट्रम देणे, आणि नियमांचे उल्लंघन करणे यांचा समावेश होता. या घोटाळ्यामुळे BSNL ला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आणि दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांना या घोटाळ्यातील त्यांची भूमिका असल्याने अटक करण्यात आली होती. CBI ने या प्रकरणाची चौकशी केली आणि अनेक आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या घोटाळ्यामुळे देशातील दूरसंचार उद्योगाच्या कार्यपद्धतीवर आणि सरकारी धोरणांवर मोठा परिणाम झाला.

निष्कर्ष

2007 च्या बीएसएनएल घोटाळ्याने सरकारी संसाधनांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या परिणामांची गंभीरता दाखवून दिली. या प्रकारामुळे बीएसएनएलला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आणि सरकारी आणि सार्वजनिक तिजोरीवर भार पडला. परंतु, 2024 आणि 2025 मध्ये 4G आणि 5G नेटवर्कच्या घोषणांनी बीएसएनएलच्या पुन्हा उभारणीचे संकेत दिले आहेत. सरकारच्या आर्थिक सहाय्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने, बीएसएनएल आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याच्या मार्गावर आहे.

स्टारलिंकच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवांनीही बीएसएनएलच्या इंटरनेट गतीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सुधारणांमुळे बीएसएनएल पुन्हा एकदा भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपले स्थान बळकट करण्यासाठी सज्ज आहे. या सर्व प्रयत्नांमुळे बीएसएनएलचा वापरकर्ता आधार झपाट्याने वाढत आहे आणि दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशावादी वातावरण निर्माण होत आहे.

READ MORE:

Leave a Reply

Our ebook website brings you the convenience of instant access.

Company

About Us

FAQs

Contact Us

Terms & Conditions

Privacy Policy

Features

Copyright Notice

Mailing List

Social Media Links

Help Center

Products

Sitemap

New Releases

Best Sellers

Newsletter

Help

Copyright

Privacy Policy

Mailing List

© 2023 Created with Royal Elementor Addons