
–श्री.किरण दशमुखे परवा मुलाच्या बारशाच्या निमित्ताने काही महिला आल्या होत्या. त्याप्रसंगी सर्वांनीच कोडकौतुक केलं. काही जणांनी बाळ अगदी आईवर गेलं हो ! बापा सारखंच हुशार निघेल वगैरे टिप्पणी केली. तर कुणी तरी “मुलगा तुम्हाला अमेरिका दाखवणार हो!” असे कौतुकास्पद भविष्योद्गार काढले. पूर्वी मुलाने आपल्या म्हातारपणी काशी वगैरे तीर्थसात्रेला घेऊन जावे ही आईवडीलांची इच्छा…