माझे अमेरिका स्वप्न

श्री.किरण दशमुखे

परवा मुलाच्या बारशाच्या निमित्ताने काही महिला आल्या होत्या. त्याप्रसंगी सर्वांनीच कोडकौतुक केलं. काही जणांनी बाळ अगदी आईवर गेलं हो ! बापा सारखंच हुशार निघेल वगैरे टिप्पणी केली. तर कुणी तरी “मुलगा तुम्हाला अमेरिका दाखवणार हो!” असे कौतुकास्पद भविष्योद्‌गार काढले. पूर्वी मुलाने आपल्या म्हातारपणी काशी वगैरे तीर्थसात्रेला घेऊन जावे ही आईवडीलांची इच्छा असे. परंतु आता जग बदललं. प्रवासाची साधनं बदलली. तेव्हा मुलाने अमेरीकेला घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं यात अतिशयोक्ती आहे असं मात्र मला मुळीच वाटलं नाही. तिकडे बाळ पाळण्यात झोपलं होतं आणि मी मात्र आपला कल्पनेच्या विमानात बसून पश्चिमेकडे थेट अमेरिकेच्या दिशेने झेपावलो होतो. मुलगा मोठा होऊन खूप शिकून अमेरिकेत चांगल्या मोठ्या नोकरीला लागला होता आणि त्याने आमच्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली होती.

वास्तविकदृष्ट्या महाराष्ट्राचीही सीमा न ओलांडलेल्या मी मात्र शालेय जीवनातील भूगोल विषयाच्या अभ्यास ज्ञानाने अमेरीकेतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत होतो. खरं म्हणजे हा सर्व प्रसंग माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला अतिशय कुतुहलजनक असा होता. आजही नाही का आकाशात काही घरघर आवाज आला की केवळ लहानच नव्हे तर मोठी माणसे सुद्धा तात्काळ डोकावून पाहतात. याचं कारण विमानाबद्दल वाटणारं कुतुहल, तेव्हा विमानाच्या प्रवासात आपण सर्वसामान्य वाटणार नाही, कुणीतरी श्रीमंत गृहस्थ वाटावा म्हणून मी सर्वप्रथम चांगला कोट शिवण्यासाठी टाकला. (लग्नाचा ब्लेझर आता पोटाचा आकार वाढल्यामुळे बसत नव्हता) सौ ने ही लग्नाचा शालू सोडला तर पहिल्यांदाच एवढी महाग साडी घेतली होती. ठरलेल्या तारखेला मी सौ सह सूट पँट, शर्ट, कोट, टाय या अवतारात विमान तळावर पोहोचलो. विमान वाप्लॅटफॉर्मवर उभं होतं. मी विमानात चढण्यापूर्वी गुपचुप कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने विमानाच्या पायरीला नमस्कार केला. (वाहनावर बसण्यापूर्वी त्याला नमस्कार करावा अशी आपली भोळी श्रद्धा) आकाशात तर एवढंसं दिसणांर विमान मात्र भलं मोठं दिसत होतं. एवढं मोठं धूड आकाशात झेपावणं म्हणजे विज्ञानाची किती मोठी प्रगती आहे असं मला वाटलं. मी मनोमन राईट बंधूंचे आभार मानले.

विमानात बसल्यानंतर एक सुंदर तरूणी लडीवाळपणे आमच्याकडे आली आणि तिने आपल्या हातांनी माझ्या भोवती बेल्ट आवळला. (यावेळी सौ. मात्र मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत असल्याचे मला जाणवले) आयुष्यात पहिल्यांदाच एका स्त्रीने माझी एवढी काळजी घेतली होती. काही वेळाने विमानात लाऊड स्पीकरवर अनाऊन्समेंट करण्यात आली. आता विमान ‘टेक अप’ घेत असल्याचं समजलं, आणि माझी भीती वाढली. सौ. मात्र मी सोबत आहे म्हणून निश्चिंत होती; आणि मनातल्या मनात अमेरीकेतील खरेदीचे मांडे खात होती. (अमेरीकन लोकांना मात्र मांडे (पुरणपोळी) हा प्रकार माहीत नाही. मला मात्र यात्रेतील ३६ताली खान्देशी पाळण्यात चुकून बसलो होतो तो प्रसंग आठवला आणि पोटातला गोळा वर सरकत असल्यासारखे वाटले. मी डोळे बंद करून घेतले होते. विमान आकाशात झेपावले होते. मी विमानाच्या खिडकीतून माझ्या जवळील दुर्बीणीने खाली पाहिले. तर प्रचंड समुद्र पसरलेला होता. भीतीने माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. मी मनातून कुलदेवतेचं स्मरण करीत होतो (हा प्रसंग दुसरा पहिला शुभमंगल प्रसंगी) न जाणो विमान कोसळलं तर असा अशुभ विचार माझ्या मनात आला. परंतु ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असं स्वतःलाच बजावून मी धीर देण्याचा प्रयत्न केला. आता विमानाने साऱ्या देशांच्या सीमा ओलांडून अमेरीकेच्या हद्दीत प्रवेश केला होता. उत्तुंग इमारती सर्वत्र नजरेस दिसत होत्या. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ जरी पाडण्यात आलं तरी विमान टकरावेल अशा अनेक इमारती तिथे उभ्या होत्या. यामुळे ती देखील एक भीती मनात होतीच. परंतु सुखरूपपणे आमचं विमान तळावर उतरलं. मला अमेरिकेचा इतिहास आठवायला लागला. अमेरीकन राज्यक्रांती डोळ्यासमोर उभी राहीली, आणि जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवतेचा पुतळा प्रथम पाहावा असे वाटले. विमानतळावरच मी माझी दैनंदिनी आखून घेतली. कुठे, केव्हा, कधी, किती वेळ कुणाला भेट द्यायची हे ठरवून घेतले. यात राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचीही भेट ठरलेली होती. त्याप्रमाणे बुश साहेबांशी मी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेवढ्यात टेबलावरील उभा ठेवलेला आरसा दाणकन खाली पडला आणि त्याचे अनेक तुकडे झाले. मी प्रत्येक तुकड्यात माझा चेहरा पाहत होतो. अर्थात सर्व तुकड्यात तो सारखाच दिसत होता. ‘तोडं तर पाहून घ्या आधी, चालले अमेरीकेला’ असंच जणू काही आरसा सांगतोय असं वाटून मी भानावर आलो.

अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

5 Comments

  • This is quality work regarding the topic! I guess I’ll have to bookmark this page. See my website 46N for content about Cosmetics and I hope it gets your seal of approval, too!

  • तुमचं लिखाण खूप छान आहे. आपण भाग्यवान आहात की आपल्या कडे तंत्रज्ञान सुद्धा आहे. अनेक मराठी लेखकाकडे आशी सुविधा नसते!
    शक्य झाल्यास आपण मला देखील आसा ब्लॉग बनवण्यास मार्गदर्शन करावे. धन्यवाद!!

  • Anil

    Very Nice article.

Leave a Reply

Our ebook website brings you the convenience of instant access.

Company

About Us

FAQs

Contact Us

Terms & Conditions

Privacy Policy

Features

Copyright Notice

Mailing List

Social Media Links

Help Center

Products

Sitemap

New Releases

Best Sellers

Newsletter

Help

Copyright

Privacy Policy

Mailing List

© 2023 Created with Royal Elementor Addons